लाल कांदा संपेपर्यंत उन्हाळी कांद्याची विक्री नाही ?

Shares

गेल्या आठ्वड्यापासून लाल कांद्याचे सरासरी दर हे हजार रुपयांच्या आतच राहिले तर उन्हाळी कांद्याचे सरासरी दर हे हजार रुपयांच्या आसपास होते. प्रत्येक वर्षी लाल तसेच उन्हाळी कांद्याची विक्रीची वेळ एकदाच येत असल्यामुळे लाल कांद्याचे दर पडत असतात.

हे ही वाचा (Read This) या सोप्या पद्धतीने करा उत्तम कंपोस्ट खत तयार !

त्यामुळे उन्हाळी कांद्यास देखील मुबलक असे दर मिळत नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे लाल कांदा संपल्यास उन्हाळी कांदयाची विक्री करण्याचे आवाहन शेतकरी अभ्यासकांकडून करण्यात येत आहे.

हे ही वाचा (Read This) ब्राह्मी या औषधी पिकाची लागवड करून मिळवा अधिकचा नफा

कांद्याचे दराने उतरता क्रम पकडण्यामागील कारण काय?

नाशिकमध्ये लाल कांद्याची लागवड ही डिसेंबर पर्यंत चालते. त्यामुळे एप्रिलपर्यंत हा कांदा बाजारामध्ये विक्रिसाठी येतो. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात लागवड केलेला उन्हाळ कांदाही मार्चपासून बाजार समितीमध्ये विक्रीला येऊ लागतो.
त्यामुळे दोन्ही कांदे एकाच वेळी आल्यावर व लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता अधिक असल्याने लाल कांद्याचे व त्यासोबत उन्हाळ कांद्याचेही दर कोसळत असतात.

हे ही वाचा (Read This)  शेवगा लागवड करून मिळवा अधिक उत्पन्न, सरकार देणार अनुदान

गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी लाल कांदा संपल्यानंतर उन्हाळी कांदा बाजारात विक्रिसाठी आणला होता. त्यामुळे दरामध्ये थोडी सुधारणा झाली होती. आता लाल आणि उन्हाळी कांदयाची विक्री सोबतच एकाच वेळी होत असल्यामुळे दरामध्ये घसरण होत आहे.

हे ही वाचा (Read This) कृषी तंत्रज्ञान: सेन्सरवर आधारित सिंचन पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार !

आता शेतकऱ्यांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये थोडी वाढ होतांना दिसून येत आहे. त्याचबरोबर नाफेड ने देखील काही प्रमाणात का होईना कांदा खरेदी करण्यास सुरुवात केल्यामुळे आता कांद्याच्या दरात अधिक वाढ होईल अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

हे ही वाचा (Read This)  राज्यातील ‘या’ शहरात येणारी लाखोंची बनावट दारू जप्त

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *