सीताफळ लागवडीतून लाखोंचं उत्पन्न .. या पद्धतीनं करा लागवड

Shares

कोरडवाहू आणि हलक्या जमिनीतसुद्धा घेता येणारे आणि भरपूर उत्पन्न देणारे फळ म्हणजे सीताफळ. सीताफळाची लागवड बऱ्याच राज्यांमध्ये केली जाते महाराष्ट्रामध्ये बीड, जळगांव, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा व भंडारा या जिल्‍हयात सिताफळाचे प्रमाण जास्त आहे. दौलताबाद, पुणे, धारुर व बालाघाट याठिकाणची सिताफळे प्रसिध्‍द आहेत.
कशी करावी लागवड :-
सिताफळाच्‍या लागवडीसाठी पावसाळयाआधी मे महिन्‍यात 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खडडे जमिनीच्या मगदूरानुसार करावे. 5 बाय 5 मिटर अंतरावर खडडे करावे, यामुळे हेक्‍टरी 400 झाडे बसतात. हेक्‍टरी खडडे पावसाळयापूर्वी शेणखत, सिंगल सुपर फॉस्‍फेट, पोयटा मातीसह भरावेत. थायमेट 10 जी बांगडी पध्‍दतीने वापरण्‍यात यावे. यासाठी हेक्‍टरी अर्धा टन शेणखत 200 किलो सिंगल सुपर फॉस्‍फेटची आवश्‍यकता आहे
खते कोणती वापरावी :-
सीताफळांना जास्त प्रमाणात खत देत नाहीत. पण मोठ्या आकाराची फळे आणि भरघोस उत्‍पन्‍न येण्‍यासाठी पावसाळा सुरु झाल्‍यावर प्रत्‍येक झाडाला साधारण 2 – 3 पाटया चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्‍ट खत द्यावे. यासोबतच झाडाच्या वाढीनुसार नत्र, स्‍फूरद, पालाश ही ३ वर्षांपर्यंत द्यावीत.5 वर्षापुढील प्रत्‍येक झाडाला 5 – 7 पाटया शेणखत किंवा कंपोस्‍ट खत आणि साधारणपणे 200 ते 500 ग्रॅम युरिया द्यावा.
कधी द्यावे पाणी :-
सिताफळाला जास्त आणि नेहमीच पाणी देण्याची सुद्धा गरज पडत नाही. फक्त पावसाच्‍या पाण्‍यावरसुद्धा चांगले उत्‍पन्‍न येऊ शकते पण झाडाची पूर्ण वाढ होण्यासाठी झाडाला सुरुवातीचे 3 – 4 वर्ष उन्‍हाळयात मुबलक पाणी दयावे. नंतर फळधारणा झाल्यावर साधारपणे सप्‍टेबर ऑक्‍टोबर महिन्‍यात पाण्‍याच्‍या 1 ते 2 पाळया द्याव्या म्हणजे फळे मोठी होतात आणि फळांचे प्रमाण सुद्धा भरपूर असते.
काळजी आणि निगा :-
१) वेळोवेळी खुरपणी करून तण काढून टाकावे.
२) रोपे लहान असताना पावसाचा त्यांच्यावर ताण पडू शकतो अश्यावेळी अधून मधून पाणी द्यावे.
३) झाडाची वाढ भरभर होण्यासाठी आणि चांगल्या प्रतीचे फळ मिळण्‍यासाठी वेळोवेळी छाटणी करावी.
४) पावसाचा मारा जास्त असल्यावर 15 ते 20 दिवसांनी पाणी द्यावे.
५) बागेमध्‍ये वेळोवेळी आंतरमशागत करावी.
सीताफळांसोबत आंतरपीक कोणते घेता येते? :-
सिताफळाचे झाड लहान असतानाच त्‍यात जमिनीच्‍या मगदुरानुसार चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, हरभरा, टरबूज
ही पिके घेता येतात.
काढणी कधी करावी? :-
फळांचे डोळे उघडायला लागल्यावर फळे उतरवायला सुरुवात करावी. साधारणपणे लागवड केल्यानंतर ५-६ वर्षांनी फळे येऊ लागतात. कलमी झाडांना ३-४ वर्षात फळे यायला सुरुवात होते. या झाडांना फुले येण्यासाठी जून – जुलै मध्ये सुरुवात झाल्यावर ४-५ महिन्यांनंतर म्हणजेच सप्टेंबर – ऑक्टोबर मध्ये फळांना सुरुवात होते. साधारणपणे सिताफळाच्‍या बहरामध्ये फळधारणेपासून 100 ते 130 दिवस काढणीसाठी धरून चलावे. ज्यावेळी फळांचे खवले उकळायला लागतात आणि आतमधील दुधाळ भाग किंचित दिसू लागतो तेंव्हा फळे तयार झाली असे समजावे आणि काढणी सुरु करावी.
सीताफळापासून जॅम, आईस्क्रीम सारख्या बऱ्याच गोष्टी बनविल्या जातात. कित्येकांचे आवडते फळ असणारे सीताफळ हे कोरडवाहू आणि हलक्या जमिनीतसुद्धा उत्तम फायदा मिळवून देते.
व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा

ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *