कांद्याच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

Shares

गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. याचे कारण म्हणजे कांद्यास मिळणारा कवडीमोल दर. यंदा कांद्याचे उत्पादन चांगले झाले असले तरी त्यास दर मात्र अगदी कमी मिळत आहे. तर या आठवड्यात कांद्याची आवक दुप्पट झाली आहे. तर दुसरीकडे बटाट्याची आवक कमी होतांना दिसत आहे.

हे ही वाचा (Read This) गुलखैरा शेती : या औषधी वनस्पतीचा लागवड करून कमी दिवसात दुप्पट नफा मिळवा

पुण्यामध्ये बाजारपेठेत कांद्याच्या दरामध्ये २ ते ३ रुपयांची वाढ झाली असून आवक देखील वाढली आहे. कांद्याचे दर एका रात्रीतून बदलतात. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचेच होत आहे. त्यामुळे कांद्याला हमीभाव देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून कांदा उत्पादक संघटनेकडून केली जात आहे.

हे ही वाचा (Read This) Summer Special: उन्हाळ्यात अति थंड पाणी पिण्याचे टाळावेत, माठातील पाणी पिणे अधिक फायद्याचे

कांद्याचे आजचे दर

kanda

कांद्याच्या आवकमध्ये वाढ

कांद्याची आवक गेल्या आठवड्यापेक्षा २७९ क्विंटलने वाढली आहे. तर बटाट्याची आवक गेल्या आठवड्यापेक्षा ११९ किंवटलने घटली आहे. मात्र दरवाढ झालेली नाही. कांद्याची ५५६ क्विंटल आवक झाली आहे. तर बटाट्याची आवक ४३३ क्विंटल झाली आहे.

हे ही वाचा (Read This) सरकारी नौकरी 2022: बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी मेगा भरती, असा करा अर्ज

फळभाज्यांची गेल्या आठवड्यापेक्षा २२३ क्विंटलने वाढली असून, २ हजार ३२५ क्विंटल एवढी झाली आहे. पालेभाज्यांच्या ३३ हजार ९५० गड्ड्या बाजारात दाखल झाल्या असून, गेल्या आठवड्यापेक्षा ७०० गड्या वाढल्या आहेत.

हे ही वाचा : आता औरंगाबाद-पुणे प्रवास फक्त सव्वा तासात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *