भारताच्या तांदूळ निर्यात बंदीमुळे तांदळाच्या किमती 10% टक्क्यांनी वाढल्या,जगभरात त्याच्या किमती वाढू शकतात

Shares

भारताने तांदूळ निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे संपूर्ण जग हादरले आहे.थायलंड आणि व्हिएतनाम सारख्या प्रमुख तांदूळ निर्यातदार देशांकडे भारताच्या निर्यातीवरील निर्बंधांमुळे कमतरता भरून काढण्यासाठी पुरेसा तांदूळ साठा नाही.

भारताने अलीकडेच तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. या निर्णयाचा परिणाम जगभर पाहायला मिळत आहे. व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने जगभरात त्याच्या किमती वाढू शकतात, जे गेल्या दहा वर्षांपासून जवळजवळ स्थिर होते.

एक वेळ खर्च आणि 40 वर्षे नफाच नफा

जगभरात तांदळाचे जागतिक उत्पादन घटले असून जागतिक स्तरावर मागणी वाढली असताना भारताने ही बंदी घातली आहे. तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भारताने तुटलेल्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली असून बिगर बासमती तांदळावर 20 टक्के निर्यात कर लावला आहे. परिणामी, जागतिक तांदळाच्या किमती 10 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत.

या रब्बीत लागवड करा राजमा मिळावा बंपर उत्पन्न, जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारताच्या बंदीचा जागतिक परिणाम का होईल

गेल्या महिन्यात, अन्न आणि कृषी संघटनेचा जागतिक मूल्य निर्देशांक 2.2 टक्क्यांनी वाढून 18 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, ओलम इंडियाचे उपाध्यक्ष नितीन गुप्ता यांना विश्वास आहे की, जागतिक बाजारात तांदळाच्या किमती आणखी वाढतील. दुसरीकडे, थायलंड आणि व्हिएतनाम सारख्या प्रमुख तांदूळ निर्यातदार देशांकडे भारताच्या निर्यातीवरील निर्बंधांमुळे तुटवडा भरून काढण्यासाठी तांदळाचा पुरेसा साठा नाही.

सरकार पाम तेलावरील आयात कर वाढविण्याच्या विचारात,सोयाबीनचे दर वाढणार का?

तीन जागतिक व्यापार्‍यांच्या मते, 2023 मध्ये जागतिक तांदळाचा साठा पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर जाऊ शकतो. यूएस कृषी विभागाने 2022/23 मध्ये 508 दशलक्ष टन जागतिक तांदूळ उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला आहे, जो चार वर्षांतील सर्वात कमी आहे. दुसरीकडे, सप्टेंबरमध्ये कृषी मंत्रालयाने या सत्रात 105 दशलक्ष टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्के कमी आहे.

सर्वात मोठे अंडे: कोंबडीचे भारतातील सर्वात मोठे अंडे! कोल्हापुरात कोंबडीने घातली 210 ग्रॅम वजनाचे अंडी

आशियाई आणि आफ्रिकन देशांवर वाईट परिणाम होईल

खराब पावसामुळे भारतातील भातशेती प्रभावित झाली. त्यामुळे सप्टेंबरमध्ये सरकारला तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालावी लागली. त्याचवेळी शेजारील पाकिस्तानात आलेल्या पुरामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले. त्याच वेळी, बांगलादेश आणि फिलिपाइन्स सारख्या प्रमुख तांदूळ खरेदीदार देशांमध्ये तांदळाचा वापर वाढला आहे.

‘किवी’ लागवडीतून मिळेल लाखोंची कमाई, जाणून घ्या शेतीशी संबंधित सर्व गोष्टी

त्यामुळे यंदा तांदळाच्या उत्पादनापेक्षा मागणी जास्त असल्याने भावात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आशिया आणि आफ्रिकेतील देशांसाठी ही सर्वात वाईट परिस्थिती सिद्ध होऊ शकते कारण तांदूळ हा मुख्य आहारांपैकी एक आहे आणि ते त्यांच्या गरजेच्या 60% आयात करतात.

PM किसान ट्रॅक्टर योजना: या दिवाळीत अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर घरी आणा, मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिली भेट

१२ वी नंतर कमवा लाखो, असे व्हा व्यावसायिक पायलेट

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *