शेतकऱ्यांना महावितरण देणार प्रति तास ५० रुपये नुकसान भरपाई

Shares

कृषी पंपासाठी साध्य विद्युत पुरवठा अनियमितपणे होत असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागा आहे. त्यामुळे जागोजागी शेतकरी आंदोलने, मोर्चे काढत आहेत. या दरम्यान शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीची भरपाई करून देण्याच्या घोषणा महावितरणकडून दिल्या जातात. मात्र वैजापूर कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरण कडून नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याबाबत कार्यकारी अभियंत्याने आंदोलकांना पत्र दिले आहे.
शेतकऱ्यांच्या एका मोर्चात महावितरण नमले, मिळणार नुकसान भरपाई.

ही वाचा (Read This ) ७/१२ वरील पुनर्वसन शेरा पुसणार, शेतकऱ्यांना जमीन मिळणार परत

आश्वासन पूर्ण न झाल्यास मिळणार प्रति तास ५० रुपये ?
शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर महावितरणने केवळ आश्वासन दिले नाही तर काही पावले उचलली आहे. रोहित्रामध्ये (DP) बिघाड झाल्यास नियमानुसार ४८ तासांच्या आत दुरुस्त करून दिले जाणार असून कृषी ग्राहकांना २४ तास वीजपुरवठा केला जाणार आहे. जर विद्युत पुरवठा खंडित झाला तर शेतकऱ्यांना प्रति तास ५० रुपये दिले जाणार आहे. असे कार्यकारी अभियंताने पत्रात नमूद केले आहे.

ही वाचा (Read This ) एका कॉल वर शेतकऱ्याचे प्रॉब्लेम होणार सॉल्व्ह, किसान कॉल सेंटर

कृषी पंपधारकांना करावा लागतोय या समस्यांचा सामना
कृषी पंपाच्या पुरवठ्याचा प्रश्न रब्बी हंगामात नेहमी उपस्थित होतो. त्यात अनियमित विद्युत पुरवठा, रोहित्रामध्ये बिघाड, विद्युत पुरवठा खंडित होणे, यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे. त्यातही शेतकऱ्यांना रोहित्राच्या दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात खेटे मारावे लागत आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *