मेथीघास लागवड आणि फायदे..

Shares

१. लसूणघासाची उपयुक्तता विविध अंगी पहावयास मिळते कारण त्याचा हिरवा चारा म्हणून वर्षभर पुरवठा होऊ शकतो.
२.  त्याच प्रमाणे वाळलेल्या अवस्थेतील अवशेष सुद्धा जनावरांना उपयुक्त ठरतात.
३. लसूणघासाचे पीक हे जमिनीची सुपिकता वाढविण्याचे काम करतात.
४. सूणघासामध्ये प्रथिनांचे प्रमाण १७-२०% असते. त्याच बरोबर क्रूड प्रोटिन्स, मिनरल्स, विटॅमिन ए, विटॅमिन डी इ. घटक सामावलेले असतात. म्हणून लसूणघासास ‘ चारा पिकांचा राजा ‘ असे संबोधले जाते.
५.  घासामध्ये डायजेस्टेबल क्रूड प्रोटीनचे प्रमाण १५.९% तसेच C. १.२५.५ इ. विविध घटकांची टक्केवारी आढळून येते.
६. थंड व कोरड्या हवामानाच्या भागात हे पीक कमी जास्त प्रमाणात वाढीस लागते.
७. लसूणघासाचे पीक हे वेगवेगळ्या जमिनीत घेता येते.
८. अगदी मध्यम प्रतिच्या, वाळूमिश्रित जमिनीपासून ते काळ्या कसदार जमिनी पर्यंतच्या भिन्न प्रकारात या पिकांची लागवड केली जाते.
९. भारी जमिन या पिकास अत्यंत उपयुक्त ठरते. १०. निचरायुक्त जमिन यासाठी गरजेची असते.
११. लसूणघासाची पेरणी ऑक्टोबर ते डिसेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत करणे फायदेशीर ठरते.
१२.  एकरी सर्वसाधारण १० किलो बी पुरेसे होते.
१३. लसूणघासाला १० ते १५ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या दिल्या पाहिजेत. उन्हाळ्यात 8 – १० दिवसांनी तर हिवाळ्यात १०-१२ दिवसांनी जमिनीजमिनीच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
११. बी फेकूनही लसूणघास लागवडीखाली आणता येतो. लसूणघासाच्या सुधारीत जाती सिरसा 9, स्थानिक, पुन 1 बी, ल्युसर्न 9, आर. एल. 88, आनंद 2, आनंद 3 इ. आहेत.
१२. लसूणघास दुभत्या जनावरांना खायला दिल्याने दुधाचे प्रमाण वाढते व त्यातील स्निग्धांशाचेही प्रमाण वाढते.
१३. लसूणघासाचे पीक प्रथम कापणीस साधारणपणे ४५ ते ५० दिवसात येते.
१४. फुलोय्रात येण्यापुर्वीच लसूणघासाची कापणी करावी.
१५.  नंतर दुसरी फवारणी कापणीनंतर ८ दिवसांनी आणि तिसरी फवारणी कापणीनंतर १५ दिवसांनी नियमित केल्यास १८ ते २२ दिवसात योग्य घास प्रत्येक वेळी तयार होतो.
१६. लसूणघासाचे वार्षिक एकरी उत्पादन 40 ते 50 टन मिळते.
हे काही प्रमुख फायदे मेथीघास लागवडीचे आहेत.. 

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *