मधमाशी पालनासाठी मिळणार 85 टक्के अनुदान.

Shares

सध्या संपूर्ण देशामध्ये शेतकरी जोडधंद्या ची निवड करत आहेत.पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, व मधमाशी पालनासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत.पशुपालन व्यवसाय साठी केंद्र सरकार मार्फत व राज्य सरकार मार्फत सतत काही ना काही योजना राबविल्या जात असतात. परंतु देशामध्ये एकमेव राज्य असे आहे की जे मधमाशी पालनासाठी अनुदान देते. हरियाणा राज्यांमध्ये मधमाशी पालनासाठी सुद्धा अनुदान दिले जात आहे. मधमाशी पालनासाठी दिलेल्या अनुदानावर आता पहिल्यापेक्षा 45 टक्क्याने वाढ केलेली आहे.या योजनेतून शेतकरी बेरोजगार तरुणांना प्रोत्साहन व प्रेरित केले जाईल. त्यामुळे बेरोजगार तरूण मधमाशी पालना कडे जास्त संख्येने वळत आहेत .

मधमाशी पालनाचा अनुदानाचा लाभ –
१. शेतकरी किंवा तरुण बेरोजगार या मधमाशी पालनाच्या व्यवसाय करण्यासाठी व अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.
२. राज्याच्या फलोत्पादन विभागाच्या म्हणण्यानुसार शासकीय योजनांमध्ये जास्तीत जास्त अनुदानाची वाढीव रक्कम लाभार्थ्यांना मिळणार.
३. बेरोजगार तरुण एकात्मिक मधमाशीपालन विकास केंद्र रामनगर कुरुक्षेत्र येथील अधिकारी किंवा तेथील उपसंचालकांची थेट भेट घेऊ शकतात.

मधमाशीपालनाचे डब्बे
१. मधमाशी पालनासाठी शेतकऱ्यांना रामनगर विकास केंद्रातून मधमाशी पालनाचे डब्बे मिळतील.
२. बागायत विभाग मान्यताप्राप्त बी ब्रिडर कडून मधमाशा उपलब्ध करून दिल्या जातील.
३. मधमाशांच्या डब्यामध्ये तुम्हाला पन्नास ते साठ हजार मधमाशा ठेवता येतील.
४. आता हा उपक्रम पूर्ण देशामध्ये राबवला जात आहे.
मधमाशी पालन करायचे असेल तर ही योजना खास तुमच्यासाठी आहे. 

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *