जायफळाचे आरोग्यदायी फायदे

Shares

मसाल्याच्या स्वरूपात वापर केले जाणारे जायफळ हे अत्यंत गुणकारी आहे. जायफळ मध्ये अत्यंत प्रभावशाली अँटिऑक्सिडंट उपलब्ध असतात. जायफळ आरोग्यासाठी अतिशय मोल्यवान समजले जाते. जायफळच न्हवे तर जायफळाचे झाड आणि बी देखील औषधी गुणांनी संपूर्ण आहे. आज आपण जायफळाच्या औषधी फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत.

जायफळाचे फायदे –
१. जायफळ मध्ये अँटिऑक्सिडंट आणि जीवनसत्वे असल्यामुळे डोळ्यांच्या संबंधित आजारांवर हे उपयुक्त ठरते.
२. डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास जायफळ मदत करते.
३. शरीरावरील डाग जात नसतील तर त्यावर जायफळ उगाळून लावल्यास डाग हलके होण्यास मदत होते.
४. कुठल्याही इन्फेकशन झालेल्या भागात जायफळाची पावडर लावावी त्याने जखम बरी होईल.
५. जायफळाचा वापर पेस्ट म्हणून केला तर तोंडाची दुर्गंधी येत नाही तसेच तोंडाच्या इन्फेकशन पासून आपला बचाव होतो.
६. दररोज जेवणानंतर जायफळाचे पावडर किंवा जायफळाचा एक छोटा तुकडा खाल्ल्यास पोटाच्या आजारांपासून आपण दूर राहतो व पचनक्रिया सुधारते.
७. जायफळाची पावडर गरम पाण्यात एकत्रित करून तो लेप सर्दी झाल्यास नाकाच्या आजूबाजूला लावावा.
८. जायफळाच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण मर्यादित राहते .

अश्या आरोग्यदायी जायफळाचे सेवन दरोरोज केल्यास अनेक समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकता.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *