शेतकऱ्यांना आनंदाची बातमी – गव्हाला मिळतोय उचांकी दर, जगात भारत ठरणार सगळ्यात मोठा निर्यातदार !

Shares

भारता बरोबरच जागतिक स्थरावर रशिया देखील गहू निर्यातीत मोठ्या प्रमाणत अग्रेसर असून, मात्र आता रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जागतिक स्थरावर गहू निर्यात कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे भारत आता गहू निर्यातीचा पर्याय म्हणून जगासमोर येताना दिसत असून, अनेक देश भारताकडून गहू तसेच साखर खरेदी करण्यास रस दाखवत आहे. त्यामुळे आता गहू उत्पादक शेतकर्यांना त्यांच्या गव्हाचा चागला भाव मिळू शकतो, याची अनुभूती देखील नंदुरबार जिल्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा बाजार समितीमध्ये गव्हाला चक्क ५ हजार ४४१ एवढा विक्रमी दर मिळाला आहे. सदरील शेतकरी हा धुळे जिल्यातील असून त्याच्या ८ क्वीन्टल गव्हा मागे तब्बल ४१ हजार पेक्षा जास्त दर मिळाला.

हे ही वाचा (Read This अभ्यासपूर्वक शेती करणं हि आता काळाची गरज…खूप महत्वाचं एकदा वाचाच

तसेच दुसरीकडे इजिप्तच्या जनरल ॲथॉरिटी ऑफ सप्लाय अँड कमोडिटीजने (GASC) यांनी भारताचा गहू आणि साखर घेण्यास पसंती दर्शवली आहे यासाठी येत्या १० एप्रिल रोजी इजिप्तमधील एक शिष्ट मंडळ देखील भारताच्या गव्हाची पाहणी करण्यास येणार आहे. हे शिष्टमंडळ भारतातील गहू उत्पादन पद्धत, त्याची गुणवत्ता ठरवण्याची प्रक्रिया, या गोष्टी समजावून घेणार आहे. तसेच पंजाब, मध्य प्रदेश आणि गुजरात या गहू उत्पादक राज्यांनाही भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे.

हे ही वाचा (Read This ) दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी  2 लाखापर्यंत मर्यादा असलेले KCC कार्ड, तुम्हीही याप्रमाणे लाभ घेऊ शकता

गव्हाच्या जागतिक बाजार भावाचा विचार केला तर भारताचा गहू अमेरिका, युरोप आणि अर्जेंटिना या तिन्ही देशा पेक्षा जवळ जवळ ७० ते ८० डॉलर प्रती टन एवढा स्वस्त पडतो, अमेरिका आणि युरोपचा गहू प्रति टन ४१० डॉलर्सला पडतो. तर अर्जेंटिनाचा गहू प्रति टन ३९६ डॉलर्सला पडतो. तसेच भारत आपला गहू ३५० डॉलर प्रति टनने अंतरराष्ट्रीय बाजारात विकतो. त्यामुळे युद्ध परिस्थितीत भारत जागतिक स्थरावर गव्हाचा मोठा बाजार ठरू शकतो.   

हे ही वाचा (Read This या आंतरपीकामुळे मिळेल भरघोस उत्पन्न

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *