अबब! दिवसाला १२ लिटर दूध देणारी शेळी

Shares

अनेक शेतकरी शेतीबरोबर जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. पशुपालनाच्या बहुतांश शेतकरी शेळीपालन करतात. हा जोडधंदा नफा मिळवून देणारा असून वेगवेगळ्या उद्धेशानुसार शेळीच्या जातीचे पालन केले जाते. तर योग्य शेळीच्या जातीचे पालन केल्यास अधिक नफा मिळण्यास मदत होईल.
मांसासाठी वेगळ्या जातीच्या शेळीचे पालन केले जाते तर दुघव्यवसायासाठी दुसऱ्या शेळीच्या जातीचे पालन केले जाते. आपण आज दुघव्यवसाय करायचा असेल तर कोणती शेळी अधिक दूध उत्पादन देते याची माहिती जाणून घेणार आहोत. ही शेळी प्रतिदिन १२ लिटर दूध देते तर ही शेळी म्हणजे सानेन शेळी होय.

ही वाचा (Read This ) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज

दूध उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे तसेच पशुपालक सतत अधिक दूध उत्पादन देणाऱ्या जातीच्या शोधात असतात. सानेन जातींच्या शेळ्यांचे मुळस्थान स्वित्झर्लंड आहे. आता युरोप, अमेरिकेपासून अफगाणिस्तानात ही शेतकरी या शेळ्या मोठ्या प्रमाणात पाळत आहेत. राज्यात शेळीपालन मोठ्या प्रमाणात केलं जातं. कमीत कमी खर्चात, कमी जागेत आणि कमी कष्टात होणारं शेळीपालन हे आजही अनेक शेतकरी कुटुंबांचा आधार

सानेन शेळीचे वैशिष्ट्ये

  • गावठी शेळ्यांच्या तुलनेने जास्त दूध देणारी सानेन शेळी अधिकचे उत्पन्न देऊन जाते.
  • या जाती कोणत्याही प्रकारच्या हवामानात तग धरू शकतात
  • मुख्य पिकांपासून मिळणाऱ्या उपप्रकार च्या उत्पादनावर या शेळ्या सहजगत्य तग धरतात
  • शेळ्या दुरवर रानात, डोंगर कपाऱ्यात करण्यास जाऊ शकतात. तसेच कमीत कमी भांडवली गुंतवणूक व्यवस्थापन करणे सहज शक्य असते.
  • कोणत्याही वातावरणाशी समरस होण्याची नैसर्गिक क्षमता असल्यामुळे कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या निवाऱ्याची गरज नसते.
  • शेळ्या सेंद्रिय पद्धतीने पाळण्यास उपयुक्त असून, सर्वसाधारण रोगांना बळी पडत नाही.
  • निकृष्ट प्रकारचे खाद्याचे, गवताचे आणि अपारंपरिक खाद्याचे दूध, मांसआणि कातडी मध्ये रूपांतर उत्तम पद्धतीने करतात.

सानेन शेळीच्या खरेदीसाठी तुम्ही इथे संपर्क करू शकता
अमोल पवार-पाटील – ९९७०५४२९७९, ७८२०९७७५८७

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *