पोषण सप्ताह निमित्य शास्वत आरोग्यासाठी पाळा काही पथ्य

Shares

सद्याच्या काळातील लहान मुलांपासुन तर जेष्ठ व्यक्तीपर्यंत स्मार्टफोनच्या वापरामुळे माहिती तंत्रज्ञानावर फार चर्चा होवूनही आरोग्याच्या तक्रारी व विविध आजार हे वाढतच आहेत. आर्थिक सुबत्ता निर्माण झाली की दैनंदिन आहारात निश्चित बदल व्हायला लागतो. नविन पिढीला बाहेरील खाद्यपदार्थ जास्त आकर्षित करुन चमचमीत पदार्थ खाण्यास प्रवृत्त करतो. अशा वेळी तरुण वयातच स्थूलपणा सोबतच हृदय रोग, अकाली केस पिकणे, सांध्यामध्ये चेदना, त्वचेचे विविध आजार व अॅलर्जी इत्यादी सारख्या समस्या भेडसावू लागल्या आहेत.

हरभरा, मूग यासह तेलबियांच्या शासकीय खरेदीची मर्यादाही 40 टक्क्यांपर्यंत वाढवावी, सरकारकडे मागणी

या सर्व समस्यामागे फक्त चुकीच्या पध्दतीने तयार केलेले अन्न हे एक प्रमुख कारण असुन, अन्न तयार करतांना प्राथमिक कृतीमध्ये चुकीच्या पध्दतीने वापरण्यात आलेले तेल व तुप होय. तेव्हा पदार्थ बनवितांना आरोग्याचे दृष्टीकोणातून हितावह होण्याकरीता कोणते तेल कशासाठी कोणत्या पध्दतीने व किती वापरले ? तर विविध होणाऱ्या व्याधीपासुन दुर राहु शकतो हे जर सर्वाना माहित झाले तर निश्चितच प्रत्येकाचे आरोग्य सुस्थितीत राहू शकते

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भात पिकासह,डाळी आणि तेलबियांची पेरणी क्षेत्र कमी तर भरड तृणधान्ये, कापूस क्षेत्र वाढले

१ ग्रॅम तेल किया चुपापासुन ९ उष्माक अन्नातुन शरीरास पुरविल्या जातात, योग्य तेल किवा तुपामुळे शरीरामध्ये पेशी तयार होवून त्वचा व केसाचे योग्य पोषण होते. हे शरीरातील नाजुक अवयवांना संरक्षण देण्याचे कार्य करते व उर्जेची साठवण करून थंड तापमानात शरीराला उब देवून वातावरणापासून सरक्षित करते. तेलामध्ये उपलब्ध असणाऱ्या ओमेगा ३ (लिनोलेनिक जेंसिड) ही पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस् म्हटल्या जाते. हे घटक उपलब्ध असणारे जवस तेल, सोयाविन तेल व मोहरी तेल होय. यामधील ओमेगा ३ असणारे फॅटस हे शरीर पोषण व आरोग्याकरीता अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

शेतकऱ्यांनो शुगर फ्री सोना मोती गव्हाच्या जातीची लागवड करा, बाजारात मिळतो चांगला भाव

सॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस् हे मटन, चिकण, दुध च नारळाचे तेल इत्यादीमध्ये जास्त प्रमाणात असल्याने या फॅटस् चे आहारातून जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरात पाईट कोलेस्टेरॉलची पातळी वाढते उदा फॅटस युक्त दुग्धजन्य पदार्थ, प्राणिजः चरबी, अडी, भेजा, कलेजी, जास्त तळलेले पदार्थ, धुर निघालेल्या तेलापासून बनविलेले पदार्थ (चायनिज), तळलेल्या तेलांचा वारंवार वापर इत्यादीचे सेवन वारंवार केल्यास रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढून रक्तवाहीण्यांच्या आतील भागावर चरबीचा थर साबुन रक्तप्रवाहामध्ये अरुदतेमुळे अडथळा निर्माण होतो व यामुळेच हार्टअटॅक किंवा स्ट्रोक येती.

SBI शेळीपालन कर्ज योजना

तेव्हा दैनंदिन वापर करत असताना नारळाचे तेल व मोहराचे तेल हे कोशीबीर, कढी व चटणी सारख्या पदार्थाना फोडणीसाठी उत्तम, कारण त्याचा धुम्रबिंदु (स्मोकींग पाईट) कमी असल्याने कमी तापमानावर फोडणी असावी पदार्थ तळण्यासाठी सूर्यफूल व शेंगदाना तेल सर्वात उत्तम असते, कारण त्याचा घुमबिंदु इतर तेलापेक्षा जास्त आहे. तसेच तिळाच्या तेलाचा स्वयंपाकात वापरण्यापेक्षा मसाज साठी जास्त उपयुक्त समजले जाते.

व्यावसायीक स्वरुपामध्ये बचत गटाला खाद्य पदार्थ विक्री करावयाची असल्यास सरकी तेल हे उत्तम तेल होय, कारण या तेलाचा चुम्म्रबिंदु जास्त असल्यामुळे खवट वासाला नियंत्रित करण्याचे घटक (अँटी ऑक्सीडंट) असल्याने ते पदार्थ काही काळापर्यंत सुस्थितीत ठेवू शकतो. तसेच आर्थिकदृष्ट्या सोयीच्या दृष्टीकोणातुन सोयाबिन तेलही सर्व प्रकारचे पदार्थ बनविण्याकरीता योग्य आहे. परंतु वरून मेल खाणान्या लोकासाठी सर्वात उत्तम तेल म्हणजे जवस तेल होय. यामध्ये ओमेगा ३ व ओमेगा ६ चे प्रमाण ४१ असल्याने हे प्रमाण स्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य ठरते. दररोजजेवणामध्ये फक्त १० ग्रॅम तेलाचा वापर केल्यास आरोग्य सुदृढ राहू शकते. यावरुन कुटूंबामध्ये प्रती महिना प्रती व्यक्ती ६०० ग्रॅम तेलाचा वापर करावा.

शेतकरी नारळाच्या झाडांचा विमा केवळ 25% खर्चात काढू शकतात – कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

वनस्पती तुप हे घातक ट्रान्सफॅटचा स्त्रोत असल्याने याचा वापर टाळलेलाच बरा. कारण पेशीचे कवच कमजोर करुन रोग प्रतिकार शक्ती कमी करते व वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवून चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते यापेक्षा । घरी बनविलेले साजूक तुप आरोग्याच्या दृष्टीने अधिक योग्य असुन बौध्दीक कार्यासाठी मदत करून वात, पित्त व कफाचे संतुलन ठेवते तसेच जठरातील अॅसिडवर नियंत्रण ठेवुन पित्त क्षमन करते… तेव्हा तेल तुपाचा शरीरावर होणारा घातक परिणाम टाळण्याकरीता अँटी ऑक्सीडंटनी समृध्द गडद रंगाची फळे व भाज्या किमान ४०० ते ८०० ग्रॅम गहण कराव्यात, तसेच अंकुरीत कडधान्य, दही, त्याचसोबत गव्हाची पाने, कडूलिंब, तुळस, कोरफड इत्यादाचे सकाळी अनशापोटी नियमितपणे सेवन केल्यास शाश्वत आरोग्य निर्मिती होऊन भविश्यातील आजारपण सहज टाळू शकू.

मत्स्य सेतू App : मत्स्य शेती करणाऱ्यांसाठी फायदेशीर, ऑनलाइन मासे विक्री आणि खरेदी करण्याची सुविधा

विश्वासु

‘डॉ. सौ. प्रणिता जि. कडू

विषय विशेषज्ञ, गृहविज्ञान विभाग, कृषि विज्ञान केंद्र, घातखेड, अमरावती मोबाईल क्रमांक ८६०५३०८९१३

जनावरांमध्ये जास्त दूध येण्यासाठी आवश्यक घरगुती उपाय करा

फी भरली नाही तर शाळा मुलांचे भविष्य उध्वस्त करू शकत नाही- न्यायालय

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *