फसल शेती यंत्र, आता मिळणार भरघोस उत्पादन

Shares

शेतकऱ्यांना शेती करणे सोपे जावे यासाठी नवनवीन आधुनिक यंत्र बाजारात येत आहेत. असेच एक फसल शेती यंत्र आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आले आहे.

हे यंत्र तुमच्या शेतीकामाच्या चांगल्या नियोजनासाठी उपयोगी ठरते. याचा वापर करून शेतीच्या सर्व कामकाजावर देखरेख ठेवता येते. तर उत्पादन वाढवण्यासाठी मदत होईल.इतकेच काय तर नैसर्गिक स्त्रोत्तांचे संरक्षण करता येते. चला तर जाणून घेवूयात या यंत्राची संपूर्ण माहिती.

फसल प्रणालीचे फायदे

१. तुमच्या फोनद्वारे कधीही आणि कुठुनही आपल्या शेतीचे अचूक व्यवस्थापन करू शकता.

२. फसल प्रणालीद्वारे मृदा व पीक आरोग्याचा तसेच त्यांच्यात असलेल्या क्षार व पाण्याच्या योग्य प्रमाणाचा आढावा घेतला जातो ज्यामुळे मधुर चवीच्या आरोग्यपूर्ण व तजेलदार फळांचे उत्पादन होते.

३. फसल प्रणालीमुळे सातत्याने तमुच्या शेताच्या सूक्ष्म हवामान स्तिथीचा आढावा घेतला जातो ज्यामुळे सिंचनबरोबरच खत पुरवठ्याचे नियोजन करता येते व अनिश्चित हवामानाचे तुमच्या पिकावरील अनिष्ट परिणाम कमी करता येतात.

४. फसल शेतकऱ्यांना बाजार साखळीच्या माध्यमातून त्यांचा उत्पादनाची विक्री करण्यास व बाजारात अधिक किंमत मिळवण्यास मदत करते.

५. फसल प्रणालीमुळे कीड व रोग प्रादुर्भावाची पूर्वसूचना मिळते व गरज असेल तेव्हाच प्रितबंधात्मक फवारणीचा सल्ला दिला जातो त्यामुळे कीडनाशकांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होतो.

फसल शेती यंत्र अधिक माहितीसाठी संपर्क करा

9113965800

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *