पिकविम्याचा तोडगा आता गावातच !
राज्यातील सर्व विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अजूनही जवळजवळ ८५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. आधीच नैसर्गिक संकटांमुळे त्रस्त झालेला शेतकरी या आर्थिक संकटात सैरभैर झाला आहे. यातही त्यांना तक्रार, चौकशी करण्यासाठी वारंवार तालुका कृषी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना गावातच तक्रार करता येईल यासाठी गावात तक्रार नोंदणी केंद्र उभे करणार आहे. ज्या ग्रामपंचायत कार्यालयात पिकविमाचा अर्ज भरला गेला होता. आता त्या कार्यालयात तक्रार नोंद करता येणार आहे. राज्य सरकाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी थोडा सुखावला आहे. कारण त्यांना तक्रार करण्यासाठी सतत तालुका कार्यालयात जावे लागत होते.
पीकविमा तक्रार अर्ज कसा , कुठे करावा ?
शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान झाल्यानंतर पीक विमासाठी अर्ज केला होता. मात्र अनेकांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाही. त्यांनी तालुका कृषी कार्यालयात तक्रार न करता गावातच ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाकडे तक्रार करावी. तक्रार करतांना खालील बाबींचा उल्लेख करणे अनिवार्य आहे.
१. पीकविमा भरलेल्या पावतीच क्रमांक
२. पावतीची झेरॉक्स
३. आधार कार्ड झेरॉक्स
४. ज्या पिकांसाठी पीकविमा भरला आहे त्या पिकांची यादी
५. पीकपेरा
पीक विमा पैसे कधी पदरात पडणार ?
शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी तालुका कार्यालयात जावे नाही लागावे यासाठी राज्यसरकारने गावातच ग्रामपंचायत कार्यालयात म्हणजेच जिथे पीकविमा अर्ज केला होता तिथेच तक्रार करता येईल याची सोय केली आहे. याने शेतकऱ्यांना अगदीच थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु पीक विमाचे पैसे कधी खात्यात जमा होणार ? या प्रश्नाचे उत्तर अजूनही भेटलेले नाही.