ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर एकदा चार्ज करा आणि ८ तास वापरा..

Shares

भारत सरकार आता लवकरच सीएनजी  ट्रॅक्टर लॉन्च करणार आहे. या ईलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे इंधनावरील खर्च – व्याप कमी होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सीएनजी  ट्रॅक्टर लॉन्च होणार आहे.
सोनालिका कंपनीने आधीच ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. या कंपनीने ट्रॅक्टरला ‘Tiger Electric’ या नावाने  मागील वर्षाच्या डिसेंबरमध्ये लॉन्च केला होता. युरोपमध्ये डिझाईन केले गेले होते,आणि याची निर्मिती भारतात करण्यात आली होती. सोनालिका Tiger Electric ट्रॅक्टर हे  अपवादात्मक कामगिरी आणि किफायतशीर मायलेज देते. हे मिनी ट्रॅक्टर मॉडेल खेचणे, कापणी, सांडपाणी, कापणी व धान्य पेरण्याचे काम यासारख्या इतर शेती कामांसाठी लक्षणीयरीत्या वापरला जातो.

सोनालिका Tiger ची वैशिष्ट्ये-
१. सोनालिका टायगर ईलेक्ट्रिक कंपनीने IP67  मानकच्या 25.5 kW ची क्षमतेचं नैसर्गिक कूलिंग कॉम्पॅक्ट बॅटरीचा वापर केला आहे.
२. या ट्रॅक्टरचं सर्वात मोठं वैशिष्ट्ये आहे ते म्हणजे डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत एक चतुर्थांशपेक्षाही कमी खर्च लागतो.
३. कंपनीनुसार  या ट्रॅक्टरला घरगुती सॉकेटनेही चार्ज केलं जाऊ शकते आणि फक्त १० तासात पूर्णपणे चार्ज होईल .
४.  दरम्यान यात वापरण्यात आलेल्या जर्मन ईलेक्ट्रिक मोटरमुळे आपल्याला शंभर टक्के टॉर्क मिळेल.
५. दरम्यान कंपनी फास्ट चार्जिंग सिस्टम पण देते. ज्याच्या साहाय्याने ट्रॅक्टरच्या बॅटरीला फक्त ४ तासात पुर्ण चार्ज करता येते.
६. हा ट्रॅक्टर २ टन  ट्रॉलीसह काम करताना २४.९ किमी प्रति तास टॉप स्पीड आणि ८ तास बॅटरी बॅकअप देते.
७. सोनालिका ट्रांसमिशन असल्याने हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण यामधून हीट निघत नाही.

सीएनजी एक स्वच्छ इंधन आहे यामध्ये कार्बन आणि अन्य प्रदूषण करणाऱ्या घटकांची मात्रा सर्वात कमी असते. तसेच या इंधनाचा वापर केल्याने फक्त पैशांची बचत न होता वायु प्रदूषण ही कमी करण्यासाठी मदत होईल.दर शेतकऱ्यांना सीएनजीवर आधारित ट्रॅक्टरचा वापर केला तर जवळजवळ वर्षाला दीड ते दोन लाख रुपये वाचू शकतात. त्यावेळी गडकरी यांनी म्हटले होते की, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थामध्ये बदल होईल तसेच मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होतील.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *