इतर बातम्या

हमीशिवाय दीड लाखांचे कर्ज, त्वरित करा अर्ज

Shares

सरकारने सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अवघ्या 20 महिन्यांत 2.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यात आले आहेत.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही माहिती दिली. तुम्हांला सांगतो की, अधिकाधिक शेतकऱ्यांना KCC उपलब्ध करून देण्यासाठी फेब्रुवारी 2020 पासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली.

किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असून आता पर्यंत भारतामध्ये २ कोटीपेक्षा अधिक किसान क्रेडिट कार्डचे वाटप झाले आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत २ ते ४ टक्यांपर्यंत व्याजदर आकारला जातो. ४ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना ३ लाख पर्यंत सहज कर्ज उपलब्ध होते.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठी खूशखबर, यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता, खरीप पिकांचे बंपर उत्पादन होणार

काय लाभ आहेत ?

  • हमीशिवाय 1.60 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होईल
  • कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास चार टक्के दराने व्याज आकारले जाईल.

टीप – लक्षात ठेवा जर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड केली नाही तर ७ टक्के दराने
व्याज भरावे लागेल.

हे ही वाचा (Read This ) या फुलाची लागवड करून मिळवा अधिकाधिक उत्पन्न, एक फुल ५० रुपये

काय आहे पात्रता?

  • KCC शेतकरी, पशुपालक शेतकरी आणि मत्स्यपालन इ. बनवू शकतात.
  • लाभार्थीचे कमाल वय 75 आणि किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर सह-अर्जदार 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे आवश्यक आहे.
  • तुम्ही इतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलेले नाही. असे केसीसी बनवण्यापूर्वी तुम्हाला बँकेत प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल.

हे ही वाचा (Read Thisबदक पालनातून शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न, कोंबड्यांपालना पेक्षा सोपे आहे

KCC कसा बनवायचा?

  • शेतकऱ्यांच्या सोयीसाठी केसीसी हे पीएम किसान सन्मान निधी योजनेत जोडले आहे.
  • तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरून KCC फॉर्म डाउनलोड करू शकता.
  • वेबसाईटच्या होम पेजवर Download KCC चा पर्याय दिसेल.
  • येथून फॉर्म डाउनलोड करा.
  • हा फॉर्म पूर्णपणे व्यवस्थितरीत्या भरा आणि जवळच्या बँकेत जमा करा.

हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *