शेती आणि के व्ही के (KVK) चे मार्गदर्शन

Shares


नमस्कार मित्रांनो,

शेती विषयक माहिती समजुन सांगणारे कृषी विज्ञान केंद्र आज शेतकर्याच्या गळ्यातले ताईत बनले आहे मला सांगतात खुप आनंद होतो की शेतीच्या बाबतीत आमचे के व्ही के घातखेड अग्रगण्य संस्था आहे ज्याप्रमाणे लोकांना निरोगी ठेवण्यासाठी आणि आवश्यक आरोग्य सल्ला देण्यासाठी दवाखाना व डॉक्टर असतातना त्याचप्रमाणे आमच्या कृषी विज्ञान केंद्रातील शेतकऱ्यांच्या सर्वच समस्या सोडवण्यासाठी आणि पिकांवरील रोगांवर उपचार करण्याचे काम तज्ञ मंडळी करतात.तसेच माझे गुरू श्री प्रमोद जी मेंढे सर हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक वेळेस हजर जवाबी असतात.
वेबीनार,शेतीशाळा किंवा कृषी विस्तार कार्यक्रम आयोजित करण्याच जणु काही विळाच उचलला आहे जिथे शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मेंढे सर उपस्थित असतात.

हे ही वाचा (Read This )  माती मधला पडद्यामागचा हीरो – जिवाणू

आधुनिक कृषी तंत्रज्ञान असो की पारंपरिक ज्ञान कौशल्ये विकसित करण्यासाठी शेतकर्यां मधे क्षमता वाढविण्याचे प्रयत्न करत आहे शेती क्षेत्रातील उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व आणि संसाधन केंद्र म्हणून काम करण्यास आमचे के व्ही के घातखेड प्रतिबद्ध आहे तसेच शेतकऱ्यांना या पीक चे संवर्धन करून कृषी सल्ला देण्यासोबतच दर्जेदार तंत्रज्ञानाची निर्मिती आणि शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते.

हे ही वाचा (Read This ) शेती मधे तंत्रज्ञानाची सांगड

आमचे मेंढे सर विस्तार च काम चोखपणे राबविण्यात तसेच वेबिनार आयोजित करण्याबरोबरच के व्ही के च्या नविन संकल्पना शेतकरी ला पोचविण्यात मदत करतात व नविन काही करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.तसेच के व्ही के घातखेड यांच्या दिल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत आणि खेड्यापाड्यापर्यंत तसेच आमच्या धारणीमधला बहूल भागात असलेल्या शेतकर्या पर्यंत आपले के व्ही के पोचले आहे. तसेच तज्ञाच्या मार्गदर्शनामुळे शेतकरी पारंपरिक शेती सोडून विज्ञानाकडे वाटचाल करत आहेत.

हे ही वाचा (Read This ) सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणीकरण महत्वाचं – एकदा वाचाच

नवं शेतकरी, तरुण-तरुणी इत्यादींना फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मशरूम उत्पादन याकडे वळवले आहे.आता शेतकरीही सेंद्रिय शेतीकडे रस दाखवत आहेत.ज्या भागात आमच्या के व्ही के घातखेड ने काम केले आहे त्या शेतकऱ्यांना तेथे शेतीमध्ये खुप फायदा झाला आहे.

 हे ही वाचा (Read This ) अभ्यासपूर्वक शेती करणं हि आता काळाची गरज…खूप महत्वाचं एकदा वाचाच
आज ज्या शेतकर्याने प्रशिक्षित घेतलं आहे तो शेतकरी शेतकऱ्यांपर्यंत कृषी ज्ञानाचा प्रसार करत आहे हे निदर्शनास आले यामुळेच के व्ही के घातखेड शेतकऱ्यांना शेतीचे नवीन तांत्रिक आणि वैज्ञानिक ज्ञान देऊन कृषी उत्पादकता अनेक पटींनी वाढविण्यात मदत कशी होईल हे या परीनं काम करत आहे.केव्हीकेने दिलेले कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अधिक सक्षम बनवता येते. त्यासाठी काही धोरण आखण्याची गरज आहे.अधिक गतिशीलतेने शेतकऱ्यांची सेवा करू शकतील अशी मला खात्री आहे.
धन्यवाद के व्ही के घातखेड

विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल
ध्येय मातीला वाचवणं
Save the soil all together

मिलिंद जि गोदे
9423361185

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *