शेती माहितीचा खजिना म्हणजे वृक्षायुर्वेद – वाचाल तर वाचाल

Shares

नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे आज थोडं महत्वाच आहे ही माहिती शेतकऱ्यांनी शेती कशी करावी व कोणत्या प्रकारची करावी ती माहिती या लेखामध्ये आहे. शेतकरी मित्रांनो ही सर्व माहिती मी वृक्षायुर्वेद या ग्रंथातुन घेतली आहे. आपले पुर्वज ऋषि, मुनी यांनी आपल्या साठी खुप महान वृक्षायुर्वेद हा ग्रंथांची निर्मिती केली सहाव्या शतकात वराहमिहिरांनी बृहत्संहितेत समुद्रशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि धनुर्विद्यावर जे लिहिले, त्यातीलच एक ग्रंथ होता वृक्षायुर्वेद! जे लिहिले सुरपालांनी. अर्थात त्यापूर्वीही वृक्षशास्त्रावर बरेच काही लिहिले गेले होते.

अर्थसंकल्प 2023: सरकारने शेतकऱ्यांसाठी खुला केला खजिना, मिळणार 20 हजार कोटींचे कर्ज

सारंगधर ऋषींनी तेराव्या शतकात सारंगधर पद्धती लिहिली होती.प्राचीन काळातील ऋषी मुनी कोणत्याही ग्रंथाचा प्रारंभ गणेशवंदनानेच करीत असत. कारण ग्रंथलेखन ही देखील पूजेइतकीच पवित्र व महत्त्वाची बाब होती आणि श्रीगणेश सर्वच मंगल कार्यांचा देव मानला जाई.गणेश वंदनाबरोबरच ऋषीमुनींनी वृक्षांचा महिमा वर्णन करताना असे सुचविले आहे की, १० पुत्रांना जन्म देण्यापेक्षा १५ वृक्ष लावणेच श्रेयस्कर आहे. १० विहिरीं पेक्षा एक पोखर, १० पोखरांपेक्षा एक तलाव, १० तलावांपेक्षा एक पुत्र आणि १० पुत्रांच्या तोडीचा एक वृक्ष असतो.

अर्थसंकल्प 2023: नैसर्गिक शेती करणाऱ्या 1 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार, 10 हजार केंद्रे सुरू होणार

वृक्ष आपल्याला जे देतात त्यामुळे धर्म, अर्थ, काम व मोक्ष यासारख्या जीवन ध्येयांची पूर्तता होते. ज्या घरात तुळस असते ते घर स्वर्गासारखे असते. जिथे बेलपत्र असतो तिथे धन असते. पूर्व दिशेने वडाचा वृक्ष, दक्षिणेला औदुंबर आणि पश्चिमेला पिंपळाचा वृक्ष असणे हे त्या स्थानासाठी अतिशय पवित्र व मंगलदायी मानले गेले आहे. घराजवळ कोणताही वृक्ष असो त्याची सावली घरावर चांगली मानली जात नाही. बगीचा घराच्या दक्षिणेला नसावी. सुरपालांच्या मतानुसार ऋषीमुनींनी अनेकानेक वृक्षांचा इतका सखोल अभ्यास केला आहे की तो वृक्षांच्या केवळ आर्थिक पैलूचाच नव्हे तर त्यातील दिव्य शक्तींचीही माहिती मिळवून देते.

अर्थसंकल्प 2023: मत्स्यशेतकऱ्यांवर सरकार मेहरबान, उत्पादन वाढवण्यासाठी 6 हजार कोटी देणार

वृक्षांसाठी जमीन कशी असावी. वृक्षाच्या बियाला कोंब फुटण्यापासून त्याची वाढ कशी कशी होते, कोणत्या टप्प्यावर त्यात कसे बदल होतात. वृक्षाला फुलं कधी येतात. फळे कधी लागतात. झाडांचे रोग कोणते. कोणते किडे वृक्ष खातात. कोणत्या वृक्षांना कोणती कीड लागते, स्थानिक उपलब्ध सामग्रीतून त्यावर कसे, केव्हा कोणते उपचार करावेत. याबद्दलही त्यांनी खूप अध्ययन केले होते. फक्त उदाहरण म्हणून झाडांच्या काही पैलूंबद्दलची ही मनोरंजक माहिती बघा. जमीन म्हणजे मातीचे अनेक प्रकार आहेत.माती कोरडी (शुष्क), दलदल आणि सामान्य प्रतीची असते.

कृषी अर्थसंकल्प 2023: 2023-24 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय खास होते, येथे A ते Z तपशील वाचा

मातीचा रंग आणि गंधावरून तिचे सहा विभाग केलेले आहेत. काळी, पांढरी, पिवळी, गडद काळी, व फिकट असे मातीचे रंग असतात. गोड, खारट, तिखट, कडू व बेचव अशा तिच्या चवी असतात. विषमय घटक, दगड, डोंगराळ भाग, खडी असलेली माती, शेती व बागायतीसाठी अनुपयुक्त मानली जाते. माती थोडी निळसर, आभाळी रंगाची, पोपटाच्या पंखासारखी कोमल (मऊ) मोगरा, श्वेतकमल किंवा चंद्रासारखी पांढरी आणि तापल्या सोन्याप्रमाणे पिवळ्या रंगाची असावी. ती एकसारखी (समतल) आणि पाणीदार असावी जर राजा, भाग्य व धन बरोबर असेल तर बागायत (माळवा) कुठेही करता येईल.

अर्थसंकल्प 2023: निर्मला शेतकऱ्यांसाठी बूस्टर, भरड धान्याला प्रोत्साहन, आता कोणीही उपाशी झोपणार नाही

बीजोपचार

सुरपालांनी शेती व बागायतीत बिजोपचारांना अत्यंत महत्त्व दिलेले आहे. त्यांचे ठाम मत होते की, बी जर निरोगी सशक्त असेल तर पीक उत्तम येईल (शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी) अनेकदा बियाण्यात, बियाच्या आत अनेक प्रकारचे किडे व रोग असतात. जे बाहेरुन दिसत नाहीत. म्हणूनच पेरणीपूर्वी बीजांवर योग्य ते उपचार करून बीज शुद्ध व सशक्त करून घ्यायला हवे. त्यांनी सांगितलेले काही बीजोपचार खालीलप्रमाणे-

१) फळातून बी काढू घ्या. पाच दिवस त्यांच्यावर दूध शिंपडून वाळवून घ्या. नंतर त्यांना राई (मोहरी किंवा सरसो) व वावडिंगाचा धूर देऊन मग पेरा.

२) बियांवर दूध शिंपडा, मोहरी, तीळ आणि बरहत्ताच्या राखेत भिजवून घोळवून त्यावर शेण चांगले घासून घ्यावे. तद्नंतर भोपळ्याचा धूर देऊन पेरणी करावी.

३) बियांवर दूध शिंपडावे. मग शेणाने धुवावे. नंतर मधात व वावडिंगात बुडवून पेरावे.

४) बी दुधात भिजवावे. मग सावलीत तीळ व कमळाची पूड लावून मोहरीच्या तेलात बुडवून पेरणी करावी.

५) विशाखा, मूळ, चित्रा, मृग, उत्तराषाढ, उत्तरा भाद्रपद, अनुराधा, ज्येष्ठा कृत्तिका ही चांगली व स्थिर लग्नाची नक्षत्रे आहेत. यावेळी पेरणी केल्यास पीक उत्तम येते.

Budget 2023 : तेलबियांच्या दरात मोठी घसरण, आता खाद्यतेल स्वस्त होणार! जाणून घ्या ताज्या किमती

रोपे लावण्याच्या पद्धती

१) अशी सपाट जमीन की जिथे (शिसवी) किंवा काळा हरभरा पेरला नसेल आणि जिथे फुलांचे आच्छादन असेल तेथे रोपे लावण्यास उपयुक्त जागा ठरते.

२) जर दोन वृक्षांच्यामध्ये १४-१६ किंवा २० हात अंतर असेल तर पहिला वृक्ष • कमी प्रतीचा, दुसरा थोडा बरा व तिसरा उत्तम प्रतीचा निघेल.

३) आंबा, डाळींब, दुधी व तांबड्या भोपळ्याच्या बिया पेरायला हरकत नाही परंतु याची कलमे लावता आली तर ते अधिक सोयीस्कर ठरेल.

४) कन्हेर व डाळिंबाच्या फांद्या खाली वाकलेल्या असाव्यात व त्यांच्या मूळाशी भरपूर शेण घातलेले असावे. दोन महिन्यापर्यंत त्यांना भरपूर पाणी घालावे. जेव्हा पाने वाढू लागतील तेव्हा त्यांना मधून मधून कापून काढावे.

५) छोटे वृक्ष जेव्हा एक हातभर उंचीचे होतील तेव्हा त्यांना दुसऱ्या जागी रोपावे. दुसऱ्या जागी लावण्यापूर्वी त्यांच्या मूळांना मध, कमळाचे देठ तूप आणि वावडिंगात बुडवून मग लावावे. मोठ्या वृक्षांना सायंकाळी (सुर्याची प्रखरता कमी झाल्यावर) त्यांची मूळे झाकलेली असतांना लावावे.

(६) फळे व फुले देणारे वृक्ष मधोमध लावून बाकीचे वृक्ष त्याच्या आजूबाजूने लावावेत. वृक्ष जोडीने लावावेत. अन् त्याच्या चारी बाजूने चर खोदावेत. वादळ, धुके, धूर, आग, कोळी यापासून वृक्षांचे रक्षण करावे.

डीएपी खताचे फायदे जाणून घ्या, डीएपी खताची संपूर्ण माहिती

वृक्षांचे पोषण

१) वर्षा ऋतूत किंवा वसंतात अथवा जेव्हा जमीन कोरडी पडेल तेव्हा औषधी वनस्पतींचा रस, गोमूत्र आणि दूध झाडांच्या मूळांना घालावे.

२) झाडांच्या मूळालगत वाढणारे तण, गवत इ. काढून टाकावे.

३) ज्या वृक्षांना तूप, वावडिंग, दूध व मध यांचा धूर दिलेला असतो ते वृक्ष लवकरच फुले व फळे देऊ लागतात.

४) जोपर्यंत पानांचा रंग गडद हिरवा होत नाही तोपर्यंत रोपाला तीव्र उन्हापासून जपावे.

५) चांगल्या मूळ धरलेल्या वृक्षाला थंडीत एक दिवसा आड पाणी द्यावे. वसंत ऋतूत रोज सायंकाळी व उन्हाळ्यात दिवसातून तीनदा पाणी द्यावे.

६) पांढरी मोहरी, जव, भुसा आणि पेंड यांचे पाणी खजूर, फणस आणि डाळिंबाच्या झाडांना मिळाल्यास त्यांना उत्तम फळे येतात.

७) जर डाळिंबाच्या झाडाला मूळाशी (खोडाशी) तूप, साखर, सफारी मासळीच्या मिश्रणासोबत त्रिफळा व तुपाचा धूर दिला तर उत्तम फळे येतात (फळधारणा चांगली होते.मंडळी माहिती भरपुर आहेत तरी थोडक्यात माहिती तयार केली

धन्यवाद

मंडळी

स्त्रोत.. वृक्षायुर्वेद

माहिती संकलन

मिलिंद जि गोदे

milindgode111@gmail.com

9423361185

बजेट 2023: काय महाग?काय स्वस्त? जाणून घ्या!

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *